68 लाखांच्या सुपारीचा ट्रक लुटणारे अटकेत

  Mumbai
  68 लाखांच्या सुपारीचा ट्रक लुटणारे अटकेत
  मुंबई  -  

  मुंबई - 68 लाखांची सुपारी भरलेला ट्रक लुटणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इरफान खान आणि राकेश सिंह अशी या दोन आरोपींची नावे असून, या दोघांना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई अहमदाबाद हायवेवर 68 लाखांची सुपारी भरलेला ट्रक 9 मार्चला या आरोपींनी हायजॅक केला होता. मात्र पोलिसांनी सापळा रचून यातील दोन आरोपींना अटक करत त्यांच्याकडून 60 लाखांची सुपारी हस्तगत केली आहे. मात्र या प्रकरणातील पाच आरोपी अद्यापही फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या आरोपींवर मुंबई,ठाणे,पालघर परिसरात 15 ते 20 चोरींचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.