सहकारी पतसंस्थेत ८ लाखांचा घोटाळा करणारा अटकेत


सहकारी पतसंस्थेत ८ लाखांचा घोटाळा करणारा अटकेत
SHARES

मुंबईच्या घोडपदेव परिसरातील श्री घोडपदेव सहकारी पतसंस्थेतील खातेदारांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला शिवडी पोलिसांनी अटक केली आहे. मेहुल धनजी बारीया असं या आरोपीचं नाव आहे. 


खोट्या स्वाक्षरी 

मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या हक्काची म्हणून ओळखली जाणारी श्री घोडपदेव सहकारी पतसंस्थेत काही वर्षांपूर्वी बारीया हा कामाला होता. ते हा घोडपदेवच्या रामभाऊ भोगले मार्गावर राहत होता. काही दिवसांतच त्याने पतसंस्थेतील अधिकाऱ्यांचा विश्वास जिंकला.  त्यानंतर त्याने पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहारात गफलत करण्यास सुरूवात केली. अनेकदा त्याने पतसंस्थेचे पैसे स्वतःच्या खासगी कामासाठी वापरले. बारीया याने खातेदारांच्या खोट्या स्वाक्षरी करूनही पैसे लाटल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. 


१५ नोव्हेंबरपर्यंत कोठडी

हा प्रकार पतसंस्थेच्या सचिव अनुप्रती टाकळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ बारीया याला राजीनामा देण्यास सांगितले. आॅडीटमध्ये बारीया याने १ डिसेंबर २०१४ ते ३१ मार्च २०१७ दरम्यान ८ लाख ३५ हजार ६७४ रुपयांची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर टाकळे यांनी शिवडी पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बारीया याच्या विरोधात ४०६, ४२०, ४६५, ४६७,४६८,४७१ कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्याला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 



हेही वाचा - 

ऐन दिवाळीत 'त्याचे' दिवाळे निघाले

डोंगरी बाल सुधारगृहातून तीन मुली पसार




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा