फसवणुकीतले ७१ लाख रुपये आरोपीने जुगारात उडवले

आरोपीच्या चौकशीत त्याने पैसे दुप्पट करण्यासाठी फसवणूकीतले ७१ लाख कसिनोत उडवल्याची कबूली पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांची तळपायाची आग मस्तकात गेली.

फसवणुकीतले ७१ लाख रुपये आरोपीने जुगारात उडवले
SHARES

गुंतवणूकीच चांगला परता देण्याचे आमी दाखवून एका खासगी कंपनीत सल्लागार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला ७१ लाखांना आरोपीने गंडवले. फसवणूकीची रक्कम पाहता हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीच्या चौकशीत त्याने पैसे दुप्पट करण्यासाठी फसवणूकीतले ७१ लाख कसिनोत उडवल्याची कबूली पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांची तळपायाची आग मस्तकात गेली. या आरोपीने अशा प्रकारे अन्य जणांनाही फसवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्या अनुशंगाने पोलिस तपास करत आहेत.

हेही वाचाः- मुंबई आणि नवी मुंबईतील खारफुटीवर पतंग किटकांचा हल्ला

२०१८ मध्ये त्याने गांधीने राजू यांना दूरध्वनी करून गुंतवणूकीवर अधिक परतावा देण्याचे आमीष दाखवले. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडे गांधीने बँक व क्रेडिट कार्डची माहिती मागितली. सुरूवातीला राजू यांनी दिली नाही. मात्र काही कालावधीनंतर आरोपीशी चांगली ओळख झाल्यानंतर त्यांनी क्रेडिटकार्डची माहिती त्याला दिली. त्याने आतापर्यंत ७१ लाख रुपयांची रक्कम दिली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोन वर्ष शोध घेतल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. सहा नोव्हेंबरपर्यंत आरोपीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने फसवणूकीतील रक्कम कसिनोमध्ये खेळलेल्या जुगारात उडवली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरोपीकडून फसवणूकीतील रक्कम हस्तगत करता आलेली नाही. आरोपीने अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे.

हेही वाचाः- आता अ‍ॅमेझॉनवरुन बुक करता येणार गॅस सिलेंडर

सौरभ गांधी असे अटक आरोपीचे नाव असून गुंतवणूकीतून अधिकचा परतावा देण्याच्या नावाखाली आरोपीने जगन्नाथ गोविंद राजू यांची फसवणूक केली. अधिक परताव्याचे आमीष दाखवल्यामुळे राजू यांनी आरोपीला त्यांच्या क्रेडीटकार्डची माहिती दिली. त्यानंतर आरोपीने स्वतःच्या इलेक्ट्रॉनिक वॉलेटमध्ये सव्वा तीन कोटी रुपये हस्तांतरीत केले. त्यानंतर वेळोवेळी ही रक्कम काढण्यात आली. गांधीने त्यातील दोन कोटी ४४ लाख रुपये परत केले. पण त्याने उर्वरीत रक्कम परत केली नाही. त्यानंतर राजू यांनी याप्रकरणी घाटकोपर येथील पंतनगर पोलिसांकडे तक्रार केली. आरोपी एका बड्या विमा कंपनीसाठी काम करत होता. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा