मुंबई सेंट्रल स्थानकात विद्यार्थिनींशी गैरर्तन, विकृताला तात्काळ अटक


SHARE

मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकाच्या फूटओवर ब्रिजवर एका व्यक्तीने २ विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सकाळच्या वेळेस ही घटना घडली आहे. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.


नेमकं काय झालं?

मुंबई सेंट्रल स्थानकावरील फूटओवर ब्रिजवर २ विद्यार्थिनी गप्पा मारत उभ्या होत्या. त्यावेळी अचानक एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि त्याने विद्यार्थिनींना नको त्या ठिकाणी स्पर्श केला. या घटनेने भेदरलेल्या विद्यार्थिनी त्या विकृताकडे पहातच राहिल्या. त्यामुळे या विकृताला तिथून पळ काढण्यासाठी संधी मिळाली.

हा प्रकार पोलिसांना कळाल्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे. मात्र हा प्रकार दिवसाढवळ्या घटल्याने महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.हेही वाचा-

भाजपा पदाधिकाऱ्याची कारमध्ये जाळून घेत अात्महत्या

मित्रानेच केली माॅडेलची हत्या, ३ तासांत झाली अटकसंबंधित विषय
ताज्या बातम्या