SHARE

साकीनाका परिसरात राहणाऱ्या भाजपाच्या चित्रपट आघाडी, मुंबईचे सेक्रेटरी योगेश कांबळे (३२) यांनी स्वत: ला कारमध्ये पेटवून घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं, तरी त्यांनी नीता गवळी या महिलेला आत्महत्येसाठी जबाबदार धरलं आहे. त्यामुळे साकीनाका पोलिसांनी नीता गवळीवर गुन्हा नोंदवून तिला अटक केली आहे.


आर्थिक व्यवहारातून आत्महत्या?

चांदिवलीच्या फार्म रोडवर आपल्या कुटुंबियांसोबत कांबळे रहात होते. तर आरोपी नीता गवळी हिचा साकीनाका परिसरात टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. साकीनाका डी.मार्ट येथल म्हाडा वसाहतीत तिचं कार्यालय आहे. या व्यवसायात कांबळे यांनी पैसे गुंतवले होते. याच व्यवहारावरून दोघांमध्ये अनेकदा खटके उडायचे.


टोकाचं पाऊल उचललं

शनिवारी सकाळी ७ वाजता नीताने योगेशला आपल्या कार्यालयात बोलावून घेतलं होतं. कार्यालयात दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, राजेशने यातून टोकाचं पाऊल उचललं. राजेशने नीताच्या गाडीत ठेवलेला पेट्रोलने भरलेला कॅन स्वत: वर ओतून घेतला आणि कारमध्ये जाऊन बसत स्वत: ला पेटवून घेतलं.


नीताचं नाव

योगेशच्या या कृत्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत कांबळे पूर्णपणे भाजले होते. त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेलं असता उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. या प्रकरणी कांबळे यांनी आत्महत्येस कारणीभूत म्हणून नीताचं नाव घेतल्याने पोलिसांनी नीतावर गुन्हा नोंदवत तिला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा-

मित्रानेच केली माॅडेलची हत्या, ३ तासांत झाली अटक

सिरियल रेपिस्ट कुरेशीचा नेहरू नगरच्या गुन्ह्यात सहभागसंबंधित विषय
ताज्या बातम्या