'डीएनए' टेस्टमुळे ८ वर्षांनी सीरियल रेपिस्टचा गुन्हा उघड!

सीरियल रेपिस्ट रेहान कुरेशी (३४) याचा नेहरूनगर येथे 2010 साली घडलेल्या पोस्को आणि हत्येच्या गुन्ह्यात सहभाग निश्चित झाला आहे. 2010 साली कुरेशीने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. वैद्यकिय अहवालातून ही बाब आता निदर्शनास आली आहे.

SHARE

मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच पालघर परिसरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या रेहान कुरेशी (३४) याच्या गुन्ह्यांचा आलेख वाढतच चालला आहे. चौकशी दरम्यान रेहान अनेक गोष्टी लपवत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याची वैद्यकिय चाचणी केली. तसेच त्याचा डिएऩए आतापर्यंतच्या उघडकीस न आलेल्या पोस्कोच्या गुन्ह्यांशी पडताळून पाहिला असता. कुर्लाच्या नेहरूनगर येथे 2010 साली झालेल्या सिरियल रेप केसमधील एका गुन्ह्याशी जुळला आहे.  

2010 मध्ये मुंबईच्या विविध ठिकाणी एका मागोमाग एक अल्पवयीन मुलींवर अनोळखि व्यक्तींकडून अत्याचार होत होते. त्यावेळी नेहरूनगर मध्ये चार घटना उघडकीस आल्या होत्या. त्यातील दोन घटनांमध्ये पोलिसांनी जावेद नावाच्या आरोपीला अटक ही केली. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. माञ नेहरूनगर मधील इतर दोन गुन्ह्यातील आरोपींचा शोध लागत नव्हता. रेहानच्या वैद्यकिय चाचणीनंतर यातील एका गुन्ह्यात रेहानशी संबध असल्याचे आता सिद्ध झाले आहे. पोलिसांनी रेहानकडे अधिक चौकशी केली असता. त्याने आपण एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्यानंतर तिची हत्या केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे.

वीस वर्षांपूर्वी परेल येथे रेहानचे कुटुंब राहायला होते. मटणाच्या दुकानाचा व्यवसाय बंद करून चमड्याच्या व्यवसायात उतरण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याच्या वडिलांची लखनऊ येथे हत्या झाली. तेव्हापासून कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी रेहानची आई व मोठ्या भावावर आहे. त्यानंतर काही वर्षांतच ते सर्व जण नवी मुंबईत ओवे गाव येथे राहायला आले. या वेळी २०१५ मध्ये रेहानने आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने त्याला अटक झाली होती. या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर त्याने एकापाठोपाठ एक गुन्हे करण्यास सुरुवात केली असावी. मात्र, पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच सुमारे चार महिन्यांपूर्वी सर्व जण मीरा रोडला राहायला गेल्याने, रेहानच्या कृत्यांची माहिती त्याच्या कुटुंबीयांनाही असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या