मित्रानेच केली माॅडेलची हत्या, ३ तासांत झाली अटक

बांगूर नगर पोलिसांनी अवघ्या ३ तासांत या हत्येचा छडा लावत मुज्जमील सय्यद या आरोपीला अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुज्जमील हा या माॅडेलचा मित्रच होता.

SHARE

मालाडच्या बांगूर नगर परिसरात एका बॅगमध्ये २२ वर्षीय माॅडेल मानसी दिक्षीत हिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र बांगूर नगर पोलिसांनी अवघ्या ३ तासांत या हत्येचा छडा लावत मुज्जमील सय्यद (२०) या आरोपीला अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुज्जमील हा या माॅडेलचा मित्रच होता.


कशामुळे हत्या?

मूळची राजस्थानची असलेली मानसी अंधेरी परिसरात रहात होत. मानसीची काही दिवसांपूर्वीच मुज्जमीलसोबत ओळख झाली होती. याच ओळखीतून मुज्जमीलने सोमवारी मानसीला आपल्या ओशीवरा येथील घरी बोलावलं होतं. त्यावेळी दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, मुज्जमीलने जड वस्तू मानसीच्या डोक्यात मारली. या मारहाणीत मानसीचा मृत्यू झाला.


मृतदेह भरला बॅगेत

मानसीचा मृत्यू झाल्याचं समजताच पोलिसांच्या भीतीने मुज्जमीलने मानसीचा मृतदेह एका बॅगेत भरला. त्यानंतर त्याने मृतदेह भरलेली बॅग बांगूर नगर येथील रस्त्यावर नेऊन टाकली. परंतु मुज्जमील बॅग टाकत असल्याचं दृष्य जवळील सीसीटीव्हीत कैद झाल्याने या हत्येचा गुंता सोडवण्यात पोलिसांना फार वेळ लागला नाही.

अवघ्या ३ तासांत पोलिसांनी या हत्येप्रकरणी मुज्जमीलला अटक केली. मुज्जमील मूळचा हैदराबाद इथं राहणारा आहे. पोलिसांनी मुज्जमीलवर हत्येचा गुन्हा नोंदवला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.हेही वाचा-

मालाडमध्ये बॅगेत आढळला तरुणीचा मृतदेह

सिरियल रेपिस्ट कुरेशीचा नेहरू नगरच्या गुन्ह्यात सहभागसंबंधित विषय
ताज्या बातम्या