मालाडमध्ये बॅगेत आढळला तरुणीचा मृतदेह


मालाडमध्ये बॅगेत आढळला तरुणीचा मृतदेह
SHARES

मालाडच्या बांगूरनगर परिसरात एका बॅगमध्ये २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. माईंड स्पेस, डबलरोड या ठिकाणी हा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


गळ्याला दोरीही 

मालाडच्या बांगूरनगर परिसरातील डबल रोड येथे दुपारी ३ वाजताच्या सुमारास एका बॅगेतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याची माहिती एका व्यक्तीने बांगूरनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना बॅगेत एका तरुणीचा मृतदेह अाढळून अाला. तरुणीच्या गळ्याला एक दोरीही होती. त्यामुळे तरुणीची गळा आवळून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं.  मृतदेह शवविच्छेदनासाठी सिद्धार्थ रुग्णालयात पाठवण्यात अाला अाहे.



हेही वाचा -

दादर फूल मार्केटमधील हत्येप्रकरणी तिघांना दिल्लीतून अटक

वडाळ्यात ज्वेलर्सवर दरोडा टाकणाऱ्या दोघांना अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा