• 'अॅसिड हल्ल्यातील कुटुंबाला भरपाई द्या'
  • 'अॅसिड हल्ल्यातील कुटुंबाला भरपाई द्या'
  • 'अॅसिड हल्ल्यातील कुटुंबाला भरपाई द्या'
SHARE

गोरेगाव - गोरेगाव येथील इराणीवाडी परिसरात राहणाऱ्या चंदन सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मंगळवारी रात्री अॅसिड हल्ला करण्यात आला होता. या कुटुंबाला न्याय मिळावा आणि आर्थिक भरपाई मिळावी या मागणीसाठी स्थानिक संतप्त झालेत. आदर्शच्या शाळेतील विद्यार्थी, स्थानिक नागरिक यांनी मालाडच्या चिंचोली गेट, स्क्वॉटर कॉलनी येथील हुसैनी चौक येथे रविवारी निदर्शनं केली. अॅसिड हल्ल्यात चंदन यांच्यासह त्यांची पत्नी आणि 4 वर्षांचा मुलगा आदर्श गंभीर जखमी झाले आहेत. आदर्शच्या तोंडावर अॅसिड पडल्यामुळे त्याची तातडीने प्लास्टिक सर्जरी करणे गरजेचे आहे. सिंग कुटुंब आर्थिकदृष्टया सक्षम नाहीत. त्यामुळे रविवारी आदर्श शिकत असलेल्या शाळेतील विदयार्थ्यांसह स्थानिक नागरिकांनी या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी निदर्शनं केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या