शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करणार – गृहमंत्री

ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करणार – गृहमंत्री
SHARES

सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक नॅशनललाईज बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

हेही वाचाः- Raj thackeray: चिंताजनक! राज ठाकरेंचे वाहन चालक निघाले कोरोना पाॅझिटिव्ह

 शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी राज्य शासन आग्रही आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक नॅशनलाईज बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या  तक्रारी प्राप्त होत आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. ज्या बँक पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचना सुद्धा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे अशा बँकांची तक्रार  जिल्हाधिकारी यांनी दिली तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अजित पवारांनी शेतकऱ्यांना केलेली मदत

अजित पवार यांनी 'महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत शुक्रवार, दि. १३ मार्च २0२0 पर्यंत राज्यातल्या १८ लाख २ हजार ४३ शेतकर्‍यांच्या खात्यात एकूण ११,४६८.३६ कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे.' याचाच अर्थ असा की १३ मार्चपर्यंत राज्यातील १७ लाख २ हजार ४३ शेतकर्‍यांना सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे.महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत शुक्रवार, दि. १३ मार्च २0२0 पर्यंत राज्यातल्या १८ लाख २ हजार ४३ शेतकर्‍यांच्या खात्यात एकूण ११,४६८.३६ कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १0 लाख ४ हजार ४४७ शेतकर्‍यांच्या खात्यात ५२७५.८६ कोटींची तर, व्यापारी बँकांच्या माध्यमातून ७ लाख ९७ हजार ५९६ शेतकर्‍यांच्या खात्यात ६१९२.५0 कोटी रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे. अजित पवार यांनी आणखी एक ट्विट करून कोणत्या बँकांमध्ये किती रक्कम जमा केली, हेही स्पष्ट केले आहे. त्यांनी ट्विट केले की, जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १0 लाख ४ हजार ४४७ शेतकर्‍यांच्या खात्यात ५२७५.८६ कोटींची तर, व्यापारी बँकांच्या माध्यमातून ७ लाख ९७ हजार ५९६ शेतकर्‍यांच्या खात्यात ६१९२.५0 कोटी रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा