Advertisement

Raj thackeray: चिंताजनक! राज ठाकरेंचे वाहन चालक निघाले कोरोना पाॅझिटिव्ह

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोन वाहन चालकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

Raj thackeray: चिंताजनक! राज ठाकरेंचे वाहन चालक निघाले कोरोना पाॅझिटिव्ह
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोन वाहन चालकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची (car drivers of mns chief raj thackeray tested covid19 positive) माहिती मिळत आहे. या दोन्ही वाहन चालकांवर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

या आधी राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी कृष्णकुंज निवासस्थानी तैनात असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्या दोघांवरही तातडीने उपचार करण्यात आल्यावर त्यांची प्रकृती सुधारली. त्यानंतर आता राज यांच्या दोन वाहन चालकांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा - शिवसेना भवनातही कोरोनाचा शिरकाव; काही दिवसांसाठी सेना भवन सील

दादरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याचं दिसून येत आहे. सोमवारी १६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यावर दादरमधील एकून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६७८ वर जाऊन पोहोचली होती. तर दादरलाच लागून असलेल्या माहीममध्ये २१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ हजारच्या जवळपास पोहोचली. त्याशिवाय धारावीत १४ नवीन कोरोना रुग्ण आढळल्याने तेथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१८४ इतकी झाली. मुख्य म्हणजे धारावीतील १०६० कोरोना रुग्ण आतापर्यंत बरे देखील झाले आहेत.

त्यातच दादर, शिवाजी पार्क येथील शिवसेना भवनात येणाऱ्या एका शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येताच शिवसेना भवन काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सेनाभवन काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काही दिवस शिवसेना भवनात येऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे.

हेही वाचा - राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजपर्यंत पोहोचला कोरोना... पण,

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा