राँग साइड, बाईकस्वारानं पोलिसांना उडवलं

दादर - दादर परिसरातील डी.एस. बाबरेकर मार्गावर बुधवारी दुपारी पोलिसांच्या बाईकला दुचाकीस्वार धडकल्याची घटना घडली. बुधवारी दुपारी हा अपघात झाला असून, या अपघातात झावळे नावाचे पोलीस शिपाई जखमी झालेत तर बीट मार्शलच्या गाडीचं देखील नुकसान झालंय. बुधवारी दुपारी पोलीस ठाण्याच्या दिशेने निघालेले हवालदार झावळे डी. एस. बाबरेकर मार्गावर येताच चुकीच्या बाजूनं येणाऱ्या एका अॅक्टिव्हा चालकानं आपली गाडी पोलिसांच्या बाईकला ठोकली. समोरून येणारी ही अॅक्टिव्हा एवढी वेगात होती की बाईकवरचे दोन्ही पोलीस धडकेनंतर अक्षरश: फेकले गेले. सुदैवानं समोरून येणाऱ्या बाईकस्वारानं ब्रेक लावल्यानं ते थोडक्यात बचावले.

Loading Comments