अभिनेता मिथुन चक्रवर्तीच्या फॅनला अटक

 Borivali
अभिनेता मिथुन चक्रवर्तीच्या फॅनला अटक

कस्तूरबा मार्ग - कस्तूरबा मार्ग पोलिसांनी मिथुन चक्रवर्तीच्या फॅनला अटक केलीय. बोरीवलीत झालेल्या चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलीय. अमित रतुल दास असं या आरोपीचं नाव आहे. अमित विरोधात अनेक पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल आहेत. पोलीस गेले अनेक महिने याच्या मागावर होते. चौकशीदरम्यान आरोपी हा मिथुन चक्रवर्तीचा फॅन असल्याचं समोर आलंय. तसंच तो अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्यासारखे कपडेही घालायचा आणि कुरियर बॉय बनून मोठमोठ्या इमारतीत जाऊन चोरी करायचा. एका घरात चोरी करत असताना तो सीसीटिव्हीत कैद झाला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी त्याला अटक केली. कस्तुरबा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र आव्हाड यांनी याबाबत माहिती दिली.

Loading Comments