सावधान इंडिया, क्राईम पेट्रोलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींना चोरीप्रकरणी अटक

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सीरियलची शूटिंग बंद झाली. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागला. डोक्यावरचं छत सुद्धा जाण्याची वेळ आली.

सावधान इंडिया, क्राईम पेट्रोलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींना चोरीप्रकरणी अटक
SHARES

कोरोना (coronavirus) लाॅकडाऊनमुळे (lockdown)  काम गेल्याने दोन अभिनेत्रींना चोरीचा पर्याय निवडावा लागला. आरे पोलिसांनी क्राईम पेट्रोल (crime petrol) आणि सावधान इंडिया (Savdhaan India) या मालिकांमध्ये काम करणाऱ्या दोन अभिनेत्रींना (actresses) अटक केली आहे. तीन लाख रुपयांची चोरी केल्याचा आरोप या दोघींवर आहे. 

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सीरियलची शूटिंग बंद झाली. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागला. डोक्यावरचं छत सुद्धा जाण्याची वेळ आली. त्यावेळी त्या आरेमधील रॉयल पाम अपार्टमेंटमध्ये १८ मे रोजी त्यांच्या मित्राकडे गेल्या. हा मित्र पेईंग गेस्ट ठेवत असे.  काही दिवसांपूर्वी या दोघी तिथे राहायला आल्या. या पेइंग गेस्टमध्ये आधीपासून एक तरुणी राहत होती. त्या तरुणीच्या लाॅकरमधून ३ लाख २८ हजार रुपये चोरुन या दोघी पसार झाल्या. तक्रारीनंतर पोलिसांनी दोघींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.

या दोन्ही अभिनेत्रींची नावे सुरभी श्रीवास्तव (२५ ) आणि मोसीना शेख (१९) अशी आहेत. त्यांची चोरी सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. सोसायटीमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या दोन्ही अभिनेत्री आपल्या हातात एक बॅग घेऊन जाताना स्पष्ट दिसल्या. चौकशी केल्यानंतर दोघींनी आपला गुन्हा मान्य केला.

क्राईम पेट्रोल, सावधान इंडियासारख्या मालिकांमध्ये यांनी काम केले असून काही वेब सीरिजमध्ये सुद्धा यांनी काम केलं होतं. त्यांच्याकडून चोरी केलेल्या रकमेपैकी ५० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. दोघींना कोर्टात हजर केले असता त्यांना २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हेही वाचा - 

पुढच्या २ ते ४ आठवड्यात महाराष्ट्रात तिसरी लाट येणार?; टास्क फोर्सची महत्वाची माहिती

मुंबईसाठी पुढील काही तास धोक्याचे; मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा