Advertisement

मुंबईसाठी पुढील काही तास धोक्याचे; मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू

मुंबईसह आसपासच्या परिसरात गुरुवारी पावसानं तुफान बॅटिंग केली. मुसळधार पावसामुळं मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले.

मुंबईसाठी पुढील काही तास धोक्याचे; मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात गुरुवारी पावसानं (mumbai rains) तुफान बॅटिंग केली. मुसळधार पावसामुळं मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले. वाहतूक खोळंबली. मात्र या मुसळधार पावसामुळे मुंबईतील मुलुंड (mulund) परिसरात भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिम (Mulund West) परिसरातील कलपादेवी पाडा परिसरातील वायदे चाळीत ही घटना घडली आहे. काल रात्री ८ च्या सुमारास वायदे चाळीतील संरक्षक भिंत कोसळली. यात एका व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाला. दिलीप वर्मा (३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मुंबईसह ठाणे पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज 

जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून जोर धरलेल्या पावसाचा मुंबईत अक्षरश: कहर सुरु आहे. दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात शुक्रवार व शनिवार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहेत. यावेळी सोसायट्याचा वाराही सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक राहावं, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबई, मुंबई उपनगर आणि वसई-विरार परिसरातही सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. विरार पूर्वमधील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी आता पुढील ३ ते ४ तास मुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यातील काही भागात सकाळपासून तब्बल १६० ते १८० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. आता पुढील ३ ते ४  तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.हेही वाचा - 

CBSE 10th result: सीबीएसई दहावीचा निकाल २० जुलैला लागणार

  1. CBSE १२ वी निकालाचा 'असा' आहे फॉर्म्युला, निकाल ३१ जुलैपर्यंत
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा