भेसळखोरांनो सावधान...!

 Pali Hill
भेसळखोरांनो सावधान...!
भेसळखोरांनो सावधान...!
See all

मुंबई - भेसळखोरांना रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग कामाला लागले आहे. एफडीए आयुक्तांच्या आदेशानुसार मुंबईसह राज्यभर 20 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. नवीन वर्षांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. या काळात अन्न पदार्थांसह दारूचीही मागणी वाढते. याचाच फायदा काहीजण घेत भेसळ करतात. ही भेसळ रोखण्यासाठी आता कडक पावलं उचलली जात आहेत. मिठाई, फळे, अन्न पदार्थासाठीचा कच्चा माल आणि अन्न पदार्थांची तापसणी करत नमुने घेण्याच्या कामालाही अधिकाऱ्यांनी सुरूवात केली आहे. याबरोबरच मद्याचे नुमनेही घेण्यात येणार असल्याची माहिती एफडीएतील सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे गोव्यातील बनावटीचे भेसळयुक्त आणि हलक्या प्रतीचे मद्य मुंबईत नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात येते. यावरही एफडीएची करडी नजर असणार आहे. या विशेष मोहिमेदरम्यान घेतलेल्या कारवाईचा अहवाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाणार आहे. तसेच यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितलं.

Loading Comments