SHARE

मुंबईला तुफान झोडपणाऱ्या पावसात सायनमध्ये एका वकिलाचा गाडीत गुदमरून मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. प्रियम रमेश मैथिया (३०) असं या वकिलाचं नाव आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या वकिलाचं महिन्याभराने लग्न होणार होतं. मुसळधार पावसात त्याच्या संसाराचं स्वप्नही वाहून गेलं आहे.

मंगळवारी पडणाऱ्या तुफान पावसाचा फटका सायनाला राहणारे वकील प्रियम मैथिया यांना देखील बसला. सायनपर्यंत पोहोचता पोहोचता त्यांना रात्रीचे १२ वाजले. ते सायनच्या गांधी मार्केट परिसरात कसेबसे पोहोचले खरेेे; पण येथे येताच गाडीने त्यांची साथ सोडली. त्यांनी बंद पडलेली गाडी सुरु करण्याचा खूपदा प्रयत्न केला. मात्र शेवटपर्यंत त्यांची गाडी सुरु झालीच नाही. रात्री १२ च्या सुमारास गांधी मार्केट जवळ त्यांना गाडी पुढे मागे करताना बघितल्याचं स्थानिकांनी सांगितलं.


गाडीत बसून राहणं जीवावर बेतलं

गाडी बंद पडल्यानंतरही प्रियम गाडीतच बसून राहिले. त्यानंतर त्यांनी आपल्या मैत्रिणीशी गप्पा मारल्या तेच त्यांचं शेवटचं संभाषण असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सकाळी साडे सातच्या सुमारास पावसाने उघडीप घेतल्यावर जेव्हा स्थानिक रहिवासी आपल्या घराबाहेर पडले, तेव्हा त्यांना निळ्या रंगाच्या सॅन्ट्रो गाडीत एक इसम बेशुद्ध अवस्थेत पडल्याचं दिसल्यावर त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी येऊन प्रियम यांना सायन रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान साडे नऊच्या दम्यान त्यांचा मृत्यू झाला.


शेवटचा कॉल मैत्रिणीला

पोलिसांनी जेव्हा प्रियमचा मोबाइल तपासला, तेव्हा त्यांनी शेवटचा फोन त्यांच्या मैत्रिणीला केला होता. मैत्रिणीने पोलिसांना सांगितलं की पुढच्याच महिन्यात त्यांचं लग्न होणार होतं.

प्रियम मैथिया यांचा मृत्यू गुदमरल्याने झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतरच त्यांच्या मृत्यूचं खार कारण कळू शकेल, अशी माहिती सायन पोलिसांनी दिली आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या