डॉक्टरांनंतर आता वकिल संपावर

 Mumbai
डॉक्टरांनंतर आता वकिल संपावर

मुंबई - बोरीवली, दिंडोशी, अंधेरी आणि वांद्रे कोर्टातील वकिल 29 मार्चला एक दिवसाच्या संपावर जात आहेत. कुरार पोलिसांनी दिलीप यादव नावाच्या वकिलाला रविवारी कानशिलात लगावली होती. पोलीस स्टेशनमध्येच हा सर्व प्रकार झाला. अशा प्रकारे अनेक वेळा वकिल टार्गेट केले जातात असा आरोप वकिलांनी केलाय. याचाच विरोध करण्यासाठी वकिल संपावर जात आहेत. 

संपाचे नेतृत्व बोरीवली कोर्टातील वकील राजेश मोरे, दिंडोशी कोर्टातील वकिल डी.के.पांडे, बोरीवली कोर्टातील वकिल भगवान मिश्रा आणि वांद्रे कोर्टातील वकिल रतन शहा करणार आहेत.

Loading Comments