स्टँडअप कॉमेडियन महिलेला धमकी, सायबर पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई

त्यात सोशल मिडियावर उमेश दादाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाला. उमेशने शिवीगाळ करत तिला धमकावले होते.

स्टँडअप कॉमेडियन महिलेला धमकी, सायबर पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई
SHARES

छ. शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी महिला स्टॅडअप कॉमेडियनला धमकावल्या प्रकरणी सायबर पोलिसांनी २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. उमेश दादा उर्फ इम्तियाज असे या आरोपीचे नाव आहे. त्याने एक व्हिडिओ प्रसारित करत त्याने महिलेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत तिला धमकावले होते.

खार येथे एका स्टुडिओत स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हीने अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छ. शिवाजी महाराजांच्या पुकळ्याला अनुसरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर मनसेकडून याप्रकाराचा जाहिर निषेध केला. ऐवढ्यावरच न थांबता मनसैनिकांनी संबधित स्टुडिओची मोडतोड ही केली होती. यावरून सोशल मिडियावर ही अग्रिमावर मोठ्या प्रमाणात टिका होत होत्या, त्यात सोशल मिडियावर उमेश दादाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाला. उमेशने शिवीगाळ करत तिला धमकावले होते. या घटनेची गंभीर दखल घेऊन सायबर पोलिसांनी उमेश विरोधात कारवाई करत त्याला अटक केली आहे. उमेश हा मूळचा नालासोपाराचा रहिवाशी आहे. शेख हा शुभम मिश्रा या तरुणाचा मित्र आहे. मिश्रानेही अशा पद्धतीने धमकावले होते. त्यालाही वडोदरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचाः- University Exams 2020: अंतिम वर्षाच्या परीक्षा नाहीच! राज्य सरकार निर्णयावर ठाम

 महिलांना सन्मान देण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलीय. पण कुणी महिलांविषयी चुकीची भाषा वापरत असेल, धमकावत असेल तर अशांसाठी कायदा आहे. महाराष्ट्र सायबर या व्हिडीओची पडताळणी करा.तसेच मुंबई पोलिसांनी व्हिडीओतील व्यक्तीविरुद्ध  नियमानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करा, असे ट्वीट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. नुकताच एका महिला स्टँड अप कॉमेडियनने शिवाजी महाराजांविरोधात केलेल्या वक्तव्यातून वाद उसळला होता. सर्व स्तरातून या महिला कॉमेडिअन विरोधात टीका होत असताना एका व्हिडिओमध्ये या तरुणाने सर्व सीमा पार करून या महिला कॉमेडियनला अश्लील भाषेत धमकावले होते. त्याचवेळी उमेश दादानेही अशाच पद्धतीचा व्हिडीओ टाकून अश्लील शब्दात या महिलेला धमकावले होते. याप्रकरणी सायबर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला होता. या महिलेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वक्तव्याबद्दलही पोलिस कायदेशीर सल्ला घेत असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही एका अधिका-याने सांगितले.

 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा