करणी सेनेच्या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेरील बंदोबस्तात वाढ

शो च्या माध्यमातून लव्ह जिहाद पसरवण्यात आणि हिंदू संस्कृतीची प्रतिमा मलिन करण्यात प्रयत्न सलमान करत असून शो बंद न केल्यास शो चे होस्टिंग करणाऱ्या अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आंदोलन छेडण्याचा इशारा करणी सेनेने दिला होता.

करणी सेनेच्या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेरील बंदोबस्तात वाढ
SHARES

या ना त्या गोष्टीमुळे कायम वादाच्या भोवऱ्यात अडकेला ‘बिग बाॅस १३’ शो बंद करण्यावरून करणी सेना आक्रमक झाली आहे. करणी सेनेने सलमान खानच्या घराबाहेर शुक्रवारी आंदोलन केलं. करणी सेनेच्या धमकीनंतर पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे.

यंदा बिग बॉसमध्ये बेस्ट फ्रेंड्स फॉरेव्हर (BFF) ही नवी संकल्पना मांडण्यात आली. यात सर्व स्पर्धकांना त्यांच्या जोड्या निवडण्यास सांगण्यात आले. या जोड्या एकाच बेडवर झोपणार असून  यात काही महिला स्पर्धकांनी पुरुष स्पर्धकाला जोडीदार म्हणून निवडलं आहे. त्यानुसार काश्मीरी मुलाबरोबर हिंदू मुलगी बेड शेअर करीत आहे. त्यामुळेच  हिंदू मुलींना आधुनिक बनवण्याच्या नावाखाली चुकीची मानसिकता पसरविली जात असल्यावर करणी सेनेनं आक्षेप घेत हा शो बंद करण्याची मागणी केली आहे.

बिग बॉस १३ शो सुरू होऊन आता अवघे २ आठवडे झाले आहेत. हा शो बंद करण्याबाबत करणी सेनेने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. पत्रात हा शो बंद करण्याची मागणी केली आहे. या शो च्या माध्यमातून लव्ह जिहाद पसरवण्यात आणि हिंदू संस्कृतीची प्रतिमा मलिन करण्यात प्रयत्न सलमान करत असून शो बंद न केल्यास शो चे होस्टिंग करणाऱ्या अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आंदोलन छेडण्याचा इशारा करणी सेनेने दिला होता. त्यामुळे गुरूवारी रात्रीपासून सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांनी खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवली आहे.  यापूर्वी करणी सेनेने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' या चित्रपटाला देखील आक्रमक भूमिका घेत विरोध केला होता. तसमच मणिकर्णिका आणि आर्टिकल १५ या सिनेमावरही करणी सेनेने आक्षेप घेतला होता.



हेही वाचा -

विदेशी चलनाच्या तस्करीप्रकरणी केनियन महिलेला अटक

५० गुन्हे असणाऱ्या नेपाळी दरोडेखोराला अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा