गोराईत आढळली आणखी एक डेडबॉडी

  Mumbai
  गोराईत आढळली आणखी एक डेडबॉडी
  मुंबई  -  

  महिलेचा मृतदेह आढळल्याने बोरीवलीच्या गोराई परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे. गोराई बेस्ट बस डेपोजवळ सोमवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह आढळला.

  या परिसरात एका आठवड्यात तीन मृतदेह आढळले असून त्यापैकी दोन मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. गोराई परिसरातच सोमवारी गिरगाव येथील ए. एस. शाह (45) नावाच्या सीएचा मृतदेह आढळला होता. 

  मंगळवारी आढळून आलेली मृत महिला 22 ते 25 वयोगटातील असून तिची गळा आवळून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या महिलेची हत्या कोणी केली, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

  एमएचबी पोलिसांनी भादंवि कलम 302 नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.