आगरवूडची तस्करी करणारा गजाआड


आगरवूडची तस्करी करणारा गजाआड
SHARES

मुंबई - विमानतळावर 25 किलो आगरवूडसह एकाला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद दिलवर हुसेन असं या तरुणाचं नाव असून, तो रियाधला जाण्याच्या बेतात असताना त्याला अटक करण्यात आली. त्याच्या बॅगेत 25 किलो आगरवूड सापडलं. आगरवूडच्या निर्यातीवर निर्बंध असून, परवानगीशिवाय त्याची निर्यात करता येत नाही. एआययूने आगरवूडची तस्करी केल्याबद्दल मोहम्मद दिलावर हुसेनविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. आगरवूड विशिष्ठ सुगंधासाठी प्रसिद्ध असून, त्याचा अत्तर आणि पारंपारिक औषधांसाठी वापर केला जातो.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा