सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला मिळाले वेगळे वळण, विसेरा रिपोर्टमध्ये मिळाले केमिकल अंश

केमिकल अंशाबाबत एम्सचे डाँक्टर सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांना संपूर्ण अहवाल लवकरच सादर करणार आहेत. मात्र याच केमिकल मुळे सुशांतचा नेमका मृत्यू झाला आहे का ? हे अद्याप सिद्ध झालेलं नाही.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला मिळाले वेगळे वळण, विसेरा रिपोर्टमध्ये मिळाले केमिकल अंश
SHARES

सुशांत सिंह राजपूत (Sushant singh rajput) प्रकरणात सीबीआयच्या हाथी अद्याप कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे सुशांतची हत्या झाली हे म्हणणं चुकीचे आहे. असे असतानाच सुशांत प्रकरणाला आता वेगळी कलटणी मिळालेली आहे. सुशांतच्या विसेरा रिपोर्टमध्ये काही केमिकल अंश मिळालेले आहेत. मात्र हे केमिकल नेमकं काय आहे. ते अद्याप कळू न शकले नसून तपास अद्याप सुरूच असल्याचे बोलले जाते.

हेही वाचाः- माणकोली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

सुशांच्या विसेरा रिपोर्टमध्ये न्यायवैद्यक प्रयोग शाळेतील (Forensic Laboratory) डाॅक्टरांनी सुशांतच्या पोट(जटर)चा काही भाग, पोटातील आतडी, यकृतचा काही भाग, पित्ताशय, किडनी, १० एमएल रक्त, डोक्यावरील केस हे न्यायवैद्यक प्रयोग शाळेत तपासण्यात आले. त्यावेळी डाॅक्टरांना विसेरा रिपोर्टमध्ये काही केमिकल अंश मिळून आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या केमिकल अंशाबाबत एम्सचे डाॅक्टर सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांना संपूर्ण अहवाल लवकरच सादर करणार आहेत. मात्र याच केमिकल मुळे सुशांतचा नेमका मृत्यू झाला आहे का ? हे अद्याप सिद्ध झालेलं नाही.

हेही वाचा:- मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी न्यायालयात अर्ज

सुशांत सिंग राजपूत मृत्यूचा तपास  (Suicide case) करत असलेल्या सीबीआयने तपास सुरू केला. एक महिन्याच्या तपासानंतरही सीबीआयच्या हाती काहीचं विशेष असं लागलं नाही. या रिपोर्टमुळे सीबीआयला किती मदत होईल हे येणारा काळचं ठरवेल. विसरा तपासणीसाठी टॉक्सिकॉलॉजी व्यतिरिक्त हिस्टो पथोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट फोरन्सिक एक्स्पर्ट डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली हा तपास करण्यात येत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा