इव्हेंट मॅनेजरला अटक

 Andheri
इव्हेंट मॅनेजरला अटक

मुंबई - मुंबईच्या एअरपोर्ट पोलिसांनी हॉटेल सहारा स्टारच्या इव्हेंट मॅनेजरला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. क्वीश फर्नांडिस (21) असं या तरुणाचं नाव असून 35 वर्षीय महिलेचा पाठलाग करून तीला धक्काबुक्की केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

सांगितलं जातंय की ही महिला देखील इव्हेंट मॅनेजर असून एका कार्यक्रमासाठी सोमवारी ती आपल्या सह कर्मचाऱ्यांसह विलेपार्लेच्या सहारा स्टार हॉटेमध्ये आली होती, तिथे लोकांना मदत करण्याची (कोऑर्डिनेशन) ची जबाबदारी ही या क्वीश फर्नांडिसवर सोपवण्यात आली होती. मात्र, बोलण्याच्या नादात क्वीश फर्नांडिसने या महिलेचं व्हिझीटींग कार्ड मागून घेतलं आणि यानंतर या महिलेशी जवळीक साधण्याचा तो प्रयत्न करू लागला. महिला आणि तिच्या सहकाऱ्यांनी क्वीश फर्नांडिसला समजावण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र तो उलटा त्यांच्याशीच हुज्जत घालू लागला लागला. शेवटी एअरपोर्ट पोलीस ठाण्यात क्वीश फर्नांडिस विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

Loading Comments