मुंबई विमानतळावर पाच कोटींचे ड्रग्ज जप्त!


मुंबई विमानतळावर पाच कोटींचे ड्रग्ज जप्त!
SHARES

मुंबई - मुंबई विमानतळावर पाच कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा मोठा साठा मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कस्टम विभागाने रबीखान अब्दुलाह नावाच्या इसमाला अटक केली असून, त्याच्याकडून 4 किलो साडेसातशे ग्रॅम्सचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. ज्यात 2680 ग्रॅम्स मेथम्फटॅमिन्स (methamphetamine) आणि 2073 ग्रॅम एफेड्रीनचा समावेश आहे. विशेष म्हणजे विमानतळावरील स्कॅनर्सपासून वाचण्यासाठी हे अमली पदार्थ रोटी मेकरमध्ये अतिशय पद्धतशीरपणे लपवण्यात आले होते. पाच कोटींचा हा साठा 15 रोटी मेकरमध्ये केवेटी बनवून नंतर अॅल्युमिनियम फॉईलमध्ये समांतर विभागून ड्रग्ज लपवण्यात आले होते. रबी खान अब्दुलाह नावाचा भारतीय परदेशी जाण्यासाठी बुधवारी रात्री मुंबई विमानतळावर आला खरा पण त्याच्या हालचाली संशियत वाटल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या सामानाच्या तपासात ड्रग्सचा हा मोठा साठा कस्टमच्या हाती लागला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा