मुंबई विमानतळावर सव्वा दोन किलो सोनं जप्त


मुंबई विमानतळावर सव्वा दोन किलो सोनं जप्त
SHARES

मुंबई - मुंबई विमानतळावर सव्वा दोन किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. तब्बल ६१ लाख अशी या सोन्याची किंमत आहे. हे सोनं लोखंडी कंटेनरमध्ये लपवून त्या सिलिंडरला वेल्डिंग करून पोर्टेबल कार वॉशिंग मशिनमध्ये लपवण्यात आलं होतं. कस्टम विभागाने ही कारवाई केली असून, अहमद थामिज हा दुबईहून मुंबईत आला होता. त्यावेळी तपासादरम्यान कस्टम विभागाने जप्तीची कारवाई केली. त्याच्याकडून दोन आयफोन्सही जप्त करण्यात आले आहेत. हे शुद्ध सोनं एवढ्या पद्धतशीरपणे लपवण्यात आलं होतं की ते बाहेर काढण्यासाठी लोखंडी कटरने सिलिंडर कापावा लागला. इर्शाद नामक व्यक्तीला हे सोनं द्यायचं होतं असं अटक केलेल्या आरोपीचं म्हणणं आहे. इर्शादलाही विमानतळाबाहेर अटक करण्यात आली आहे. कस्टम विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा