#MeToo : टाटा इन्स्टिट्युट अाॅफ सोशल सायन्सच्या प्राध्यापकावर विद्यार्थीनीचा अारोप

फेसबुकवर पोस्ट टाकून प्रीती कृष्णन या टाटा इन्स्टिट्युट अाॅफ सोशल सायन्सच्या माजी विद्यार्थीनीने तिचे सल्लागार प्राध्यापक पी. विजयकुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा अारोप केला अाहे.

#MeToo : टाटा इन्स्टिट्युट अाॅफ सोशल सायन्सच्या प्राध्यापकावर विद्यार्थीनीचा अारोप
SHARES

#MeToo चं वादळ अाता देशातील शैक्षणिक संस्थांपर्यंतही पोहोचलं अाहे. टाटा इन्स्टिट्युट अाॅफ सोशल सायन्स (टीस) च्या माजी विद्यार्थीनीने एका प्राध्यापकावर लैंगिक शोषणाचा अारोप केला अाहे. विद्यार्थीनीच्या या अारोपाची दखल संस्थेने घेतली अाहे. याबाबत विद्यार्थीनीशी बोलणं झालं असून या प्रकरणाची चौकशी करून अावश्यक कारवाई केली जाईल, असं संस्थेने म्हटलं अाहे. 


घरी बोलावलं

 फेसबुकवर पोस्ट टाकून प्रीती कृष्णन या टाटा इन्स्टिट्युट अाॅफ सोशल सायन्सच्या माजी विद्यार्थीनीने तिचे सल्लागार प्राध्यापक पी. विजयकुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा अारोप केला अाहे. फेसबुक पोस्टमध्ये प्रीतीने लिहिलं की, ती २००४ ते २००६ या कालावधीत संस्थेमध्ये एमए करत होती. यावेळी प्राध्यापक पी. विजयकुमार यांनी संस्थेच्या परिसरात असलेल्या अापल्या घरी शोधनिबंधाबाबत चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं. यावेळी मी त्यांच्याशी चांगलं बोलले अाणि त्यांची व्याख्याने अायोजीत करण्यास मी मदतही केली. मात्र, अखेरच्या दोन ते महिन्यात त्यांच्या वागण्यात बदल दिसून अाला. 


चुंबन घेण्याचा प्रयत्न

प्रीतीने म्हटलं की,  प्राध्यापक विजयकुमार यांनी अापलं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही अनेकदा त्यांच्या घरी अाणि कार्यालयात असे प्रकार करण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला. दरम्यान,  विजयकुमार १४ नोव्हेंबरपर्यंत सुट्टीवर अाहेत. या अारोपांबाबत व्यवस्थापनाकडून चौकशी केली जाईल, असं टाटा इन्स्टिट्युट अाॅफ सोशल सायन्सच्या व्यवस्थापनाने म्हटलं अाहे. 



हेही वाचा - 

#MeToo : अभिनेते अलोक नाथ यांना न्यायालयाचा झटका; याचिका फेटाळली

#MeToo: जोहरी यांना निलंबित करा, ७ राज्यातील क्रिकेट मंडळांची मागणी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा