सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआयच्या अडचणीत वाढ

सुशांतच्या व्हिसेरा नमुन्याचे ८० टक्के भाग हा तपासणी दरम्यान मुंबई पोलिसांनी वापरल्याने फक्त २० टक्के भाग उरला आहे

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआयच्या अडचणीत वाढ
SHARES

सुशांत आत्महत्या प्रकरणात सीबीआयच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. इतक्या दिवसानंतर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवल्याने पुरावे गोळा करताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. त्यात आता  सुशांतच्या व्हिसेरा नमुन्याचे ८० टक्के भाग हा तपासणी दरम्यान मुंबई पोलिसांनी वापरल्याने फक्त २० टक्के भाग उरला आहे. या २० टक्के नमुन्यातच सीबीआयला या प्रकरणाचा छडा लावावा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचाः- सुशांत आत्महत्या प्रकरणात शवविच्छेदन करणाऱ्या डाॅक्टरांनी केला मोठा खुलासा

सुशांत आत्महत्येला दोन महिने उलटले मात्र त्याच्या आत्महत्ये मागील कारण आजही गुलदस्त्यात आहेत. या प्रकरणात आता सीबीआयने तपास सुरू केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाशी संबधित सर्वाशी सीबीआय चौकशी करत आहेत. मागील तीन दिवसात सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तीन ते चार वेळा सुशांतच्या घरी तपासासाठी गेले होते. त्याठिकाणी सीबीआयने  आत्महत्यचे रिएक्शनही करून पाहिले. या रिएक्शनमध्ये  सुशांतच्या वजनाचा पुतळा त्याने गळफास घेतलेल्या ठिकाणी अडकवून पाहिला, तर त्याने ज्या वेळी आत्महत्या केली. त्यावेळी घरात उपस्थित असलेला सिद्धार्थ पठानी, कूक निरज आणि चावी बनवण्यासाठी बोलवण्यात आलेल्या सुशांत सावंत याची सीबीआयने चौकशी केली.

हेही वाचाः-सुशांत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिस तोंडघशी, तपास सीबीआयकडे

सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलिस करत असताना. त्यांनी सुशांतचे शवविच्छेदन कूपर रुग्णालयात केले.  ते शवविच्छेदन करणाऱ्या पाच डाॅक्टरांनी केलेले आरोपामुळे मुंबई पोलिसांच्या अडचणीत आधीच वाढ झालेली आहे. डाँक्टरांनी केलेल्या आरोपानुसार पोलिसांनीच रात्री उशिरा आणि लवकरात लवकर शवविच्छेदन करण्यास सांगितल्याचा खुलासा केला आहे. तर सुशांतचा व्हिसेरा कलीना येथील न्याय वैद्यक प्रयोग शाळेत पाठवण्यात आला होता. त्यातील ८० टक्के नमुने मुंबई पोलिसांनी तपासासाठी वापरले  असल्याचे न्याय वैद्यकिय प्रयोग शाळेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे २० टक्के नमुन्याच्या आधारे आता सीबीआयच्या अधिकाऱ्यांना तपास करावा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.   

संबंधित विषय