पोलिसाचीच पिस्तुल चोरली, घरफोड्या करणारे बहिणभाऊ गजाआड


पोलिसाचीच पिस्तुल चोरली, घरफोड्या करणारे बहिणभाऊ गजाआड
SHARES

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात घरफोड्या करणाऱ्या भावा बहिणीला आंबोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुरुप्रीत कुलजीत सिंग (२३) आणि कमलजीत कुलजीत सिंग (१८) अशी या बहिणभावाची नावे आहेत.

आर्श्चयाची बाब म्हणजे या दोघांनी मिळून मुंबई पोलिसांच्या 'एटीएस' मध्ये असलेले पोलीस नाईक नितीन मोहिते यांच्या भायखळा पोलीस वसाहतीतील घरातून ९ एम. एम. सर्व्हिस पिस्तुल आणि ३० जीवंत कडतूस चोरून मोठी खळबळ उडवून दिली होती. आंबोली पोलिसांनी दोघांकडून चोरलेल्या दागिन्यांसाह मोहितेंची पिस्तुल आणि २७ काडतूस जप्त केली आहेत.



नवरा तुरूंगात गेल्यावर भाऊ मदतीला

गुरूप्रीत सिंग ही एक सराईत गुन्हेगार असून तिच्यावर घरफोडीच्या १८ गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती आंबोली पोलिसांनी दिली. गुरूप्रीत सुरूवातीला तिच्या नवऱ्यासह घरफोड्या करत असे. पण नवरा तुरूंगात गेल्यापासून ती आपल्या भावाला जोडीला घेऊन घरफोड्या करू लागल्याचे समोर आले.



अशी करायची चोरी

गुरूप्रीत चोरी करताना नेहमीच आपल्या जोडीला कुणाला तरी सोबत ठेवत असे. एखाद्या इमारतीत काम मागण्याच्या बहाण्याने घुसल्यावर बंद घर दिसल्यास दोघेही मिळून ते घर फोडत असत. नाकाबंदीत महिला सोबत असल्यास पोलीस पकडत नाहीत म्हणून गुरूप्रीत नेहमीच चोरीचा ऐवज स्वतःकडे ठेवत असे.



पोलीस वसाहतीत चोरी

भायखळा येथील पोलीस वसाहतीत राहणारे मोहिते यांच्या घरी ३० जुलै रोजी झालेल्या चोरीत पिस्तुलासह ३० जीवंत काडतूस गायब झाल्याने पोलीस खात्याची झोप उडाली होती. भायखळा पोलिसांसह, गुन्हे शाखा, मालमत्ता कक्ष आणि एटीएस या चोरीचा तपास करत होते.

त्यातच सोमवारी आंबोली पोलीस ठाण्यातील एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांना या दोघांची खबर मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनीही पिस्तुल आणि काडतूस चोरी केल्याची कबुली दिली.



हे देखील वाचा -

पोस्टात पैसे गुंतवताय? जरा सांभाळून, माहीममध्ये झालाय कोट्यवधींचा घोटाळा



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा