ट्रॅफिक पोलिसावर पुन्हा हल्ला

 Santacruz
ट्रॅफिक पोलिसावर पुन्हा हल्ला
ट्रॅफिक पोलिसावर पुन्हा हल्ला
ट्रॅफिक पोलिसावर पुन्हा हल्ला
ट्रॅफिक पोलिसावर पुन्हा हल्ला
See all

सांताक्रुझ - वाकोला आंबेडकर चौक इथं ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक पोलिसाला मारहाण झाल्याची घटना पुन्हा समोर आलीय. पोलीस नाईक पांडुरंग जोंधळे यांनी सिग्नल तोडल्याप्रकरणी बाईकस्वार प्रकाश पावेश याला अडवलं. प्रकाश पावेश सोबत त्याची बायकोही होती. अडवल्यानंतर प्रकाश जोंधळे यांचा फोटो घेऊ लागला. पण जोंधळे यांनी प्रकाशला अडवलं. रागाच्या भरात प्रकाशनं जोंधळे यांना मारायला सुरुवात केली. याप्रकरणी प्रकाश आणि त्याच्या पत्नीला बंदर कोर्टात हजर केलं जाणाराय. वाकोला पोलीस स्टेशनचे अधिकारी राजेंद्र पवार हे या प्रकरणाचा अधिक तपास करतायेत. 

Loading Comments