शाळेतील विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 'त्या' ट्रस्टीला अटक


शाळेतील विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 'त्या' ट्रस्टीला अटक
SHARES

अंधेरीतील नामांकीत शाळेतील निरागस चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम ट्रस्टीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी शाळेचे ट्रस्टी असलेल्या पॅट्रिक ब्रिलिअंट (५७) याला अटक करण्यात आली असून त्यांना मंगळवारी दिंडोशी सत्र न्यायालयात हजार करण्यात आले, जिथे त्याला १४ तारखेपर्यंत पोलीस कोठाडी सुनावण्यात आली आहे. पॅट्रिक ब्रिलिअंट हा फ्रांसचा नागरिक आहे.


एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला केली अटक 

१८ मे रोजी शाळेचे ट्रस्टी असलेल्या पॅट्रिक ब्रिलिअंट यांच्या विरोधात शाळेतील एका लहान मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाला त्यावेळी पॅट्रिक हे परदेशात असल्याने पोलिसांना त्यांना अटक करणे शक्य नव्हते. या प्रकरणी पॅट्रिक यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टाने अर्ज फेटाळल्यानंतर मंगळवारी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी त्यांना अटक केली.


चिमुरड्यांवरील अत्याचाराचे आणखी प्रकार उघडकीस

पीडित मुलगी ही नर्सरीत शिकत असून गुन्हा दाखल होण्याच्या काही दिवसांपूर्वी मुलीच्या गुप्तांगावर आईला ओरखड्या सारख्या खुणा दिसल्या. आईने मुलीला विचारले असता घडलेला प्रकार तिने सांगितला. त्यानंतर आईच्या तक्रारींवर शाळेचे ट्रस्टी असलेल्या पॅट्रिक ब्रिलिअंट विरोधात ३७६ (२) बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

यावेळी शाळेतील शिक्षकांनी मुलीला ट्रस्टीच्या खोलीत नेल्याची माहिती देखील उघडकीस आली. याप्रकरणी आणखीन एका मुलाबरोबर असाच प्रकार झाल्याचं समोर आलं होतं.

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार साडेतीन वर्षांच्या या मुलीला आणखीन एका मुलासह शाळेलच्या शिक्षिकेने ट्रस्टीच्या खोलीत नेले, जिथे तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. अंधेरी पूर्वला असलेली ही शाळा अतिशय नामांकीत असून या शाळेत सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मुलांसह मंत्र्यांची मुले देखील शिकतात.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा