कासव, पोपटाची तस्करी करणारे गजाआड

क्रॉफर्ड मार्केट - अनधिकृतपणे स्टार टर्टल आणि पॉन्ट टर्टल या जातीच्या कासवाची विक्री करणाऱ्या तिघांना ठाणे वनविभाग आणि प्लॅन्ट अॅन्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीने सापळा रचून अटक केली आहे. या तिघांकडून विशिष्ट जातीचे 6 कासव , 15 पहाडी आणि 5 भारतीय पोपट ताब्यात घेण्यात आले आहेत. मिखाइल खा, संदीप मोरे आणि महमद फयाज अशी या तीन आरोपींची नावे असून, त्यांना ठाण्याच्या वनविभागाने मुंबईतून अटक केली.

Loading Comments