फेसबुक पोस्टप्रकरणी आणखी आठ जणांना अटक


SHARE

ट्रॉम्बे - येथील पोलीस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 8 जणांना सोमवारी पोलिसांनी अटक केली असून, या हल्ल्यातील अटक आरोपींची संख्या आता 25 झाली आहे. रविवारी पहाटे पोलिसांनी एकूण 17 आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. 

फेसबुकवरील आक्षेपार्हे पोस्टमुळे शनिवारी मध्यरात्री ट्रॉम्बेमध्ये पोलीस आणि रहिवाशांमध्ये वादावादी झाली होती. यामध्ये जामावाने पोलीस ठाण्यावर हल्ला करत पोलिसांच्या तीन वाहनांचं मोठं नुकसान केलं होतं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या