गोवंडी - अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने रविवारी सकाळी गोवंडी येथून अटक केली. अहमद शेख (20) आणि सुरेश सावंत (31) अशी या आरोपींची नावे आहेत. सदर आरोपी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून या आरोपींना अटक केली. दोघेही गोवंडी परिसरातील राहणारे असून पोलिसांनी त्यांच्याकडून 320 ग्रॅम एमडी जप्त केली आहे. ज्याची किंमत 6 लाख 40 हजार रुपये इतकी आहे.