अर्णबने घेतला अटकपूर्व जामीन अर्ज मागे


अर्णबने घेतला अटकपूर्व जामीन अर्ज मागे
SHARES

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटकेसाठी गेलेल्या पथकातील महिला पोलिसाला मारहाण प्रकरणी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी गुरुवारी मागे घेतला. गुन्हा दाखल झाल्यावर अर्णब आणि त्यांच्या पत्नीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

हेही वाचाः- भारतात बंदी असूनही PUBG ठरला सर्वाधिक कमाई करणारा गेम

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक याच्या आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे Republic TV editor संपादक अर्णब गोस्वामी Arnab goswami याला अलिबाग पोलिस पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी मात्र अटक करण्यासाठी ज्या वेळी पोलिस अर्णबच्या घरी गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण करत त्याच्याशी हुज्जत घातली. पोलिसांना त्याने १ तास घराबाहेर ठेवले. त्यानुसार ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्यात अर्णब आणि तिच्या कुटुंबियातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी अर्णबने अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. मात्र गुरूवारी अर्णब आणि त्याची पत्नीने न्यायालयात हा अटकपूर्व जामीनचा अर्ज मागे घेतला.

हेही वाचाः- मेसेज येणार तरच कोरोना लस मिळणार- राजेश टोपे

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी अलिबागजवळील कावीर इथं आपल्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या आई कुमुद नाईक यांचाही घरात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी गोस्वामी यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना राहत्या घरातून अटक केली. अर्णब गोस्वामी यांना चौकशीसाठी अलिबागला नेलं होतं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा