मृताच्या खात्यातून एटीएममार्फत पैसे काढले, चोरट्याला अटक


मृताच्या खात्यातून एटीएममार्फत पैसे काढले, चोरट्याला अटक
SHARES

 गोवंडीत मृत नौदल अधिकाऱ्याच्या खात्यातून साडेदहा लाख रुपये काढणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.  मेनन या ३९ वर्षीय चोरट्याने एटीएम चोरून ही रक्कम काढली होती. 

 

बँकेत चौकशी

नौदलाचे निवृत्त कॅप्टन रॉल्स कुटिनो गोवंडीच्या गंगा सोसायटीत राहत होते. ४ जून २०१७  रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून साडेदहा लाख रुपये काढण्यात आल्याचे कुटिनो यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आले. मृत व्यक्तीच्या खात्यावरून पैसे गायब झाल्यामुळे त्यांनी याबाबत बॅँकेत चौकशी केली. यावेळी एटीएमच्या सहाय्याने ही रक्कम काढण्यात आल्याचं त्यांना समजलं. कुटिनो यांच्या मृत्यूनंतर ही रक्कम काढण्यात आल्यामुळे त्यांच्या भावाने गोवंडी पोलिसांकडे तक्रार केली. 


घरात एटीएम सापडलं 

 ज्या एटीएम सेंटरवरून पैसे काढल होते तेथील सीसीटिव्ही पोलिसांनी तपासले. त्यावेळी आरोपी मेननची ओळख पटली. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्हाची कबूली दिली. कुटिनो घरात एकटेच राहत होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर एक-दोन दिवसांनी त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली होती. त्यावेळी त्यांचा मृतदेह घरातून बाहेर काढण्यासाठी आरोपी मेनन तेथे आला होता. त्यावेळी त्याला कुटिनो यांचे पडलेले एटीएम कार्ड सापडले. त्याद्वारे त्याने पैसे काढल्याची कबुली दिली.



हेही वाचा - 

ठाण्यात मेडिकलच्या अभ्यासाच्या ताणामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

कुर्लात विवाहितेवर सामुहिक बलात्कार




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा