शहरात डमी आमदारांचा सुळसुळाट! पोलिस अडवतात म्हणून लढवली 'ही' शक्कल


शहरात डमी आमदारांचा सुळसुळाट! पोलिस अडवतात म्हणून लढवली 'ही' शक्कल
SHARES
कोरोनामुळे सर्वञ लाँकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सहाजिकच घरात बसून प्रत्येकाला कंटाळा आला असणार, माञ  माटुंगात एकाने घरात बसून कंटाळा आल्याने बाहेर फिरण्यासाठी आणि पोलिस कारवाईपासून वाचण्यासाठी बाप बेट्याने त्यांच्या गाडीवर चक्क आमदारांचा स्टिकर लावल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. माटुंगा पोलिसांनी त्याच्या विरोधात तोतयागिरी, तसेच संचारबंदी मोडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून  त्याची कार जप्त केली आहे.  शहरात कोरोनाचा आकडा दिवसे-दिवस वाढत चालला आहे. याला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण अशा परिस्थितीतही लॉकडाऊनचे अनेक महाभागाकडुन उल्लंघन सुरु आहे. यामुळे पोलिसांनी राज्यभरात धडक कारवाई आणि नाकांबदी लावली आहे. खाजगी वाहनाना विना परवाना बाहेर फिरण्यास सक्त मनाई असताना देखील काही माथफिरु दुचाकी, चारचाकी घेऊन बाहेर फिरत आहेत. अशातच पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी काही जण नवनवीन क्लृप्त्यांचा अवलंब करत आहेत. माटुंगा परिसरात होंडा सिटी कार फिरताना पोलिसांना आढळली. त्या कारवर विधानसभा आमदार व अशोक स्तंभाचे स्टीकर चिकटवण्यात आले होते.

याबाबत कार चालवणा-या कमलेश शहा (54), मुलगा तनिश शहा (28) यांच्याजवळ चौकशी केली.  त्यावेळी गाडीवर लावण्यात आलेले स्टीकर बनावट असल्याचे निष्पन्न झाले. अखेर त्याच्याविरोधात तोतयागिरी, बनावटीकरण, संचारबंदीचा भंग व संसर्गजन्य आजार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   आरोपीचे पार्श्वभूमी  तपासण्याचे काम सुरू असून  प्राथमिक तपासात तरी लॉकडाऊन मध्ये फिरण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा