आर्यन खानच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

बुधवारची रात्र देखील त्याला तुरुंगातच काढावी लागणार आहे.

आर्यन खानच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी
SHARES

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावरची सुनावणी गुरुवारी होणार आहे. त्यामुळे बुधवारची रात्र त्याला तुरुंगातच काढावी लागणार आहे. गुरुवारी सेशन्स कोर्टात ही सुनावणी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

बुधवारी झालेल्या सुनावणीत, एनसीबीनं न्यायालयात आपली बाजू मांडली. एनसीबीनं न्यायालयाला सांगितलं की, जरी आर्यन खानकडून बंदी घातलेला पदार्थ जप्त केला नसला तरी तो एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. एनसीबीनं न्यायालयाला असंही सांगितलं की, आर्यन खानवर प्रतिबंधित पदार्थ वापरल्याचा आरोप आहे. तो बंदी असलेला पदार्थ अरबाज मर्चंटकडून जप्त करण्यात आला आहे.

एनसीबीनं न्यायालयात म्हटलं आहे की, एका आरोपीचे आरोप आणि इतरांवरील आरोप वेगळे केले जाऊ शकत नाहीत. तपास यंत्रणेनं सांगितलं की, या प्रकरणाचा तपास अत्यंत महत्त्वाचा आहे. एनसीबीनं म्हटलं आहे की, या प्रकरणात एजन्सी परदेशातून पैशांच्या व्यवहाराबाबत तपास करत आहे, जे अत्यंत महत्वाचे आहे.

एनसीबीनं (NCB) २ ऑक्टोबरला रात्री एका क्रुझवर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा मारला. याप्रकरणी ८ लोकांना अटक करण्यात आली होती. यात शाहरुखचा मुलगा आर्यन खान देखील होता. 

क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू असताना आर्यन क्रुझवर उपस्थित होता.  त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली होती. आर्यन समवेत त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपुर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा यांना देखील ताब्यात घेतलं. 


हेही वाचा

आर्यन खान प्रकरणातील साक्षिदारावरच फसवणुकिचे गुन्हे दाखल

मुंबई पोलिसही करणार क्रूझ पार्टी प्रकरणाचा तपास

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा