लाचखोर सहाय्यक अभियंत्याला रंगेहाथ अटक


लाचखोर सहाय्यक अभियंत्याला रंगेहाथ अटक
SHARES

फोर्ट परिसरात अनधिकृत बांधकामांविरोधात केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी तक्रारदाराला दीड लाखांची लाच देणाऱ्या मुंबई महापालिकेच्या 'ए' वाॅर्डातील सहाय्यक अभियंत्याला बुधवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. शैलेश सदानंद गौड (46) असे या अभियंत्याचे नाव आहे.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फोर्ट परिसरात उभारलेल्या तीन अनधिकृत बांधकामांविरोधात तक्रारदाराने महापालिकेकडे तक्रार केली होती. यातील दोन तक्रारी लेखी, तर एक तक्रार तोंडी नोंदविण्यात आली होती. तक्रारीवरून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे अपेक्षित असताना महापालिकेच्या 'ए' वॉर्डातील लाचखोर सहाय्यक अभियंता गौड याने अनधिकृत बांधकाम केलेल्या मालकांकडून प्रत्येकी 50 हजार रुपयांप्रमाणे दीड लाख रुपये घेतले. एवढेच नव्हे, तर त्यांना या बांधकामावर कारवाई न करण्याचे आश्वासनही दिले.


हेही वाचा - 

लाच घेताना अंधेरी आरटीओच्या लिपिकाला अटक


त्यानंतर अनधिकृत बांधकामधारकांकडून मिळवलेली ही रक्कम तक्रारदाराला देण्याचे आमिष दाखवून केलेल्या तक्रारी मागे घेण्यास सांगितले. मात्र तक्रारदाराने थेट एसीबीकडे धाव घेतली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तपासाअंती फोर्ट परिसरात सापळा रचून तक्रारदाराला दीड लाख रुपये देताना गौड याला रंगेहाथ अटक केली.


हेही वाचा - 

सहाय्यक आयुक्ताला लाच घेताना अटक


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा