बालवयातील लग्न उठले तरुणाच्या जीवावर

Dahisar, Mumbai  -  

दहिसर - एका महिलेच्या पहिल्या पतीने दुसऱ्या पतीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना दहिसर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पहिल्या पतीसोबत त्याच्या कुटुंबातील दोघांना अटक केली आहे. नागेश, करण आणि अक्का भरवाड अशी या तिन्ही आरोपींची नावे असून, पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

बृजेश गुप्ता याच्या पत्नीचे लहानपणी भरवाड परिवारातील एका मुलासोबत लग्न झाले होते. मात्र युवती मोठी झाल्यावर तिने प्रेमसंबंधातून ब्रृजेश गुप्तासोबत लग्न देखील केले. लग्न केल्यानंतर हे दाम्पत्य मध्यप्रदेशमध्ये राहायला गेले. त्यानंतर हे दाम्पत्य पुन्हा मुंबईत स्थलांतरित झाले. ज्यावेळी भरवाड कुटुंबाला याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी अॅग्रीमेंटवर सही करायची आहे असं सांगून गुप्ताला बोलावून घेतलं आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यात बृजेश गुप्ता गंभीर जखमी झाला आहे.

Loading Comments