नवी मुंबईत भाजपा नगरसेविकेसह पतीवर प्राणघातक हल्ला

दोघांनी अगदी जवळून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. आपल्यावर हल्ला होत असल्याचे संदीप यांच्या लगेच लक्षात आल्यावर त्यांनी बाजूला होण्याचा प्रयत्न केला.

नवी मुंबईत भाजपा नगरसेविकेसह पतीवर प्राणघातक हल्ला
SHARES

नवी मुंबईत (Navi Mumbai) भाजप नगरसेविकेवर (BJP corporator) आणि त्यांच्या पतीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. कौपरखैरणेतील (kopar khairane)  त्यांच्या कार्यालयात घुसून दोन हल्लेखोरांनी कोयत्यानं हा हल्ला केला. 

भाजपा नगरसेविका संगिता म्हात्रे ( sangita mhatre) आणि त्यांचे पती संदीप म्हात्रे (sandip mhatre) हे रविवारी रात्री कोपरखैरणेतील सेक्टर ६ मधील त्यांच्या कार्यालयात बसले होते. यावेळी दोघे जण कार्यालयात घुसले आणि त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्याकडे कोयते, चाकू व रिव्हाल्व्हरही होते. दोघांनी अगदी जवळून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. आपल्यावर हल्ला होत असल्याचे संदीप यांच्या लगेच लक्षात आल्यावर त्यांनी बाजूला होण्याचा प्रयत्न केला. त्यात हल्लेखोरांचा वार खांद्यावर बसले.

आरोपींकडून हल्ला होताच दोघांनीही आरडाओरड केली. त्यानंतर आरोपींनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांनी एका आरोपीला पकडलं. त्याच्याकडे कोयता, चाकू व रिव्हॉल्व्हर मिळाले आहे. तर दुसरा आरोपी फरार झाला आहे. 

जखमी संदीप म्हात्रे यांच्यावर वाशीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून कौपरखैरणे पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. संदीप म्हात्रे हे नवी मुंबईतील कोपरखैरणे भागातील समाजसेवक असून भाजप आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक मानले जातात.



हेही वाचा -

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी-विरार मार्गावरील प्रवाशांना दिलासा!

रेल्वे तिकीटाच्या आरक्षणासाठी लागणार आधार, पॅनकार्ड?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा