Advertisement

रेल्वे तिकीटाच्या आरक्षणासाठी लागणार आधार, पॅनकार्ड?

हा अवैध प्रकार थांबवण्यासाठी अशा २१ सॉफ्टवेअरवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.

रेल्वे तिकीटाच्या आरक्षणासाठी लागणार आधार, पॅनकार्ड?
SHARES

रेल्वेनं प्रवास करताना अनेकदा प्रवाशी आपल्या तिकिटांच्या आरक्षणासाठी तिकीट दलालांच्या जाळ्यात सापडतात. हे तिकीट दलाल विविध प्रकारच्या जलद सॉफ्टवेअरचा वापर करून अवैध मार्गाने तिकीटे काढतात. त्यामुळं हा अवैध प्रकार थांबवण्यासाठी अशा २१ सॉफ्टवेअरवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.

या अवैध तिकीट काढण्याला आळा घालण्यासाठी व बेकायदा दलालांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी आयआरसीटीसीच्या (इंडियन रेल्वे कॅटरिंग टूरिझम कॉपरेरेशन) संकेतस्थळावरुन रेल्वे तिकिटाचं आरक्षण करताना आधार कार्ड, पॅनकार्ड  किंवा पासपोर्ट जोडण्याची योजना असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे काम अंतिम टप्प्यात आहे.

आयआरसीटीसीच्या  संकेतस्थळावरुन तिकीट आरक्षणासाठी 'लॉगइन' आयडी तयार करावे लागते. त्यासाठी कोणतीही सरकारी कागदपत्र जोडावी लागत नाहीत. याचाच गैरफायदा अनेक जण उचलतात. त्याला आळा बसावा यासाठी लॉगइन करताना आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा पासपोर्ट जोडता येतो का याची चाचपणी सरू असल्याचं समजतं.

त्यामुळे तिकीट आरक्षित करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड किं वा पॅनकार्ड, पासपोर्ट संकेतस्थळावर दर्शविले जाईल.



हेही वाचा -

पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी मुदतवाढ, 'ही' आहे शवटची तारीख

रिलायन्सनं गुगलसोबत मिळून लॉन्च केला जियोफोन नेक्स्ट, १० सप्टेंबरपासून होणार विक्री

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा