पुन्हा झाला पत्रकारावर हल्ला

  Kharghar
  पुन्हा झाला पत्रकारावर हल्ला
  मुंबई  -  

  नवी मुंबई - पत्रकारांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. शुक्रवारी अशीच एक घटना खारघर परिसरात घडली. डीएनएचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी आणि त्यांचा मित्र संतोष याच्यावर 4-5 जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12.30 ते 1 च्या सुमारास घडली. 

  संतोष खतटे आणि सुधीर सूर्यवंशी खासगी कामासाठी पनवेलवरून खारघरला आले असता त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. यावेळी हल्लेखोरांनी संतोष यांच्या स्विफ्ट गाडीचा टायर फोडला. दरम्यान हल्लेखोरांनी मोटार सायकलवरून पलायन केले. सुधीर सूर्यवंशी आणि संतोष यांना उपचारासाठी खारघरच्या मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सूर्यवंशी यांच्याकडून माहिती घेतली असून, त्यानुसार तपास सुरु केला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.