इकबाल मिर्चीच्या संपत्तीच्या लिलावास तुर्तास स्थगिती

राखीव ठेवलेली ३ कोटी ५४ लाख रुपयांची बोली ही बाजार भावापेक्षा अधिक वाटत होती. त्यामुळे पुन्हा लवकरच लिलावाची नवीन तारीख ठरवून पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

इकबाल मिर्चीच्या संपत्तीच्या लिलावास तुर्तास स्थगिती
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक म्हणून ओळखला जाणारा इकबाल मिर्चीच्या मुंबईतील संपत्तीचा लिलाव मंगळवारी होऊ शकला नाही. याचे कारण म्हणजे अर्थ मंत्रालयाकडून आयोजित लिलावामध्ये बोली लावणाऱ्या व्यक्तींना लिलावाच रक्कम मोठी वाटत होती. बाजारभावापेक्षा मालमत्तांची रक्कम अधिक ठेवल्यामुळे या संपतीच्या लिलावास स्थगिती देण्यात आली असून लवकरच नवीन तारीख प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.


जुहूतारा रोड येथे इक्बाल मिर्चीचे दोन अलिशान फ्लँट आहेत. सध्या या दोन्ही फ्लँटची किंमत तीन कोटी ४५ लाख इतकी आहे. या दोन्ही फ्लँटचा लिलावा आज सफेमाच्या नरीमन पाँईट येथील कार्यालयात होणार आहे. काही महिन्यांपूर्वी याच सफेमाच्या कार्यालयात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेचा लिलावा करण्यात आला होता. १९९४ साली पोलिसांनी मिर्चीला तडीपार म्हणून घोषीत केले. त्यावेळी तो दाऊदचा अंमली पदार्थ तस्करीचा व्यवसाय संभाळायचा. कालांतराने मिर्चीने भारतातून पळ काढला. त्याला पकडण्यासाठी इंटरपोलने ही नोटीस काढण्यात आली. सौदी अरेबीया येथे जाऊन लपलेला मिर्ची कालांतराने कुटुंबासोबत लंडन येथे स्थायिक झाला. त्या ठिकाणी तो लिगल इस्टेटचा व्यवसाय करू लागला. माञ १४ आँगस्ट २०१३ रोजी त्याचा मृत्यू झाला. मुंबईत त्याच्या व त्याच्या कुटुंबियांच्या नावे पाच मालमत्ता असल्याचे कुटुंबियांच्या चौकशीतून पुढे आले होते. यातील दोन मालमत्ता मेसर्स सनब्लिक व मिलेनियम डेव्हलपर्स प्रा.लि.यांना विकण्यात आल्या. वरळीत २०११ मध्ये सनब्लिक रिअल्टर्सला विकण्यात आल्या.

सिजय हाऊस ही १५ मजली मिर्ची व मिलेनियम डेव्हलपर्स यांनी संयुक्तरित्या २००७ मध्ये बांधली. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील दोन फ्लँट मिर्चीच्या कुटुंबियांच्या नावावर २००७ मध्ये करण्यात आले आहेत. या मालमत्तेवर ईडीने सफेमा अंतर्गत टाच आणली. या मालमत्तेचा लिलावा मंगळवारी ईडीने नरीमपाँईट येथील कार्यालयात आयोजित केला होता. मात्र राखीव ठेवलेली ३ कोटी ५४ लाख रुपयांची बोली ही बाजार भावापेक्षा अधिक वाटत होती. त्यामुळे पुन्हा लवकरच लिलावाची नवीन तारीख ठरवून पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मंगळवारी मुंबईतील इकबाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबियांसह इतर प्रकरणातील ६ प्रॉपर्टीचा लिलाव होणार होता. हा लिलाव स्मग्लर्स एंड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एक्ट एजन्सीच्या कार्यालयात होणार होता. इकबाल मिरचीची मुंबईतील सांताक्रूज पश्चिमच्या मिल्टन अपार्टमेंट्स मध्ये फ्लॅट नंबर ५०१ आणि ५०२ अशी संपत्ती आहे.

त्या शिवाय मिर्चीच्या  मेमर्स व्हाईट वाटर लि.च्या नावाने खंडाळ्यात सहा एकर जमीन देखील खरेदी करण्यात आली आहे.त्याचा ताबा मिर्चीच्यी दोन मुलांकडे आहे. त्याच बरोबर साहिल नावाचा बंगला त्याची पत्नी आणि मुलाच्या नावावर आहे. तर वरळीतील समंदर महल येथील मालमत्ता मेव्हणा आणि बहिणीच्या नावावर आहे. त्या व्यतिरिक्त भायखळा येथील रोशन हाऊस चिञपटगृह, क्राफर्ड मार्केचमध्ये तीन गाळे, जुहू तारारोडवरील मिनाज हाँटेल, पाचगणी येथे बंगला अशा ५०० कोटींच्या मालमत्तांवर ईडीची नजर आहे.

 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा