दुचाकीच्या धडकेत रिक्षाचालक ठार

 Mumbai
दुचाकीच्या धडकेत रिक्षाचालक ठार

शीव - यशवंतराव चव्हाण मार्गावर बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास रिक्षा आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक मोहम्मद अन्वर मोहम्मद सत्तार शेख (41) याचा मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार निनाद जीवक घेगडमल (24) हा गंभीर जखमी झालाय. दुचाकीस्वारावर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर रिक्षाचालक शेख यांनाही या रुग्णलयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ट्रॉम्बे पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केलाय.

Loading Comments