रिक्षाचालकाला अज्ञाताने लुटले

 Chembur
रिक्षाचालकाला अज्ञाताने लुटले

पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षाचालकाला धक्का देत त्याच्या खिशातील मोबाइल जबरीने चोरल्याची घटना रविवारी सायंकाळी चेंबूरच्या कलेक्टर कॉलनीमध्ये घडली आहे. येथील शिवशक्तीनगर परिसरात राहणारा विकास समुद्रे (25) हा रिक्षाचालक नेहमीप्रमाणे याच परिसरात रिक्षा पार्किंग करून घरी जात होता. 

एका अनोळखी व्यक्तीने त्याला धक्का देत त्याच्या खिशातील मोबाइल घेऊन पळ काढला. घटनेनंतर रिक्षा चालकाने चेंबूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Loading Comments