मालाडमध्ये दोन गटातील वादातून सात गाड्या पेटवल्या


मालाडमध्ये दोन गटातील वादातून सात गाड्या पेटवल्या
SHARES

मालाडच्या कुरार येथे दोन गटात झालेल्या वादातून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षा आणि मोटारसायकलची तोडफोड करत त्या जाळल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी कुरार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे.


पार्किंगमधील रिक्षा पेटवल्या

बुधवारी मध्य रात्री कुरार व्हिलेजमध्ये गाड्या उभ्या करण्यावरून दोन गटात वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन एका गटाकडून दुसऱ्या गटातल्या चालकाला मारहाण करण्यात आली. त्याला दुसऱ्या गटाकडून प्रत्युत्तर म्हणून त्या ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षा दुसऱ्या गटाने पेटवल्याचं कळतं.

या आगीत एकूण सात गाड्या पेटवल्या असून 4 रिक्षा आणि 3 दुचाकी पूर्णत: जळून खाक झाल्या आहेत. याप्रकरणी कुरार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा