काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी अडचणीत


काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी अडचणीत
SHARES

काँग्रेस नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या मुंबईतील विविध ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे. वांद्र्यातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 100 कोटींच्या घोटाळ्यात बाबा सिद्दीकी आणि त्यांचा एक सहकारी बिल्डर रफीक मकबूल कुरेशी यांचा हात असल्याचा आरोप आहे. त्यावरूनच बाबा सिद्दीकी आणि रफीक कुरेशी यांच्या 5 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. वांद्रे येथील झोपडपट्टी विकासाच्या नावाखाली सुमारे 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप, बाबा सिद्दीकी आणि रफीक कुरेश यांच्यावर आहे. बनावट दस्तऐवज बनवून पैसे लाटल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

वांद्रे परिसरातील झोपडपट्टी विकास करायचा असेल तर, नियमानुसार त्यातील एक भाग झोपडपट्टीधारकांसाठी ठेवावा लागतो. मात्र, बनावट कागदपत्रांच्या आधारे या प्रकरणात फसवणूक करत हा घोटाळा केल्याचा ठपका बाबा सिद्दीकी आणि रफीक कुरेशींवर आहे. या छापेमारी दरम्यान बिल्डर रफीक कुरेशी यांच्या कंपनीने बाबा सिद्दीकींच्या कंपनीला पैसे दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकींच्या अडचणी वाढल्या आहेत.
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून सिद्दीकी हे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपदही भूषवले आहे. तसेच ते बॉलिवूड कलाकारांच्याही खूप जवळचे मानले जातात.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा