वांद्रे प्रकरण: आणखी तिघांना अटक,सहा ताब्यात


वांद्रे प्रकरण: आणखी  तिघांना अटक,सहा ताब्यात
SHARES
मुंबईत कोरोनाचा संसर्ग दिवसंदिवस वाढत असताना, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांद्वारे लाँकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली. या लाँकडाऊनला विरोध म्हणून वांद्रे येथे कामगार जमू लागले. सोशल मिडियावरीस अफवेला बळी पडून हे कामगार जमा झाल्याचे पुढे आल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी तीन गुन्हे नोंदवले. त्यात एका मराठी न्यूज रिपोटरचा ही समावेश आहे. दुसरा गुन्हा विनय दुबे यांच्यावर नोंदवला तर तिसरा जमावावर नोंदवला पहिल्या दोन्ही गुन्ह्यात अटकेची कारवाई केल्यानंतर पोलियांनी आता जमावाला एकजूट करणाऱ्यांकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

मुंबईच्या वांद्रे पश्चिम स्थानकाजवळ दुपारी अचानक त्या परिसरातील कामगारांनी गर्दी करण्यास सुरूवात केली. लाँकडाऊनमुळे काम नाही, पैसे संपले, जेवणाच हाल होत असल्याचे सांगत नागरिक रस्त्यावर उतरले. लॉकडाऊनमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी संबंधित लोक त्यांच्या मूळगावी जाण्याचा हट्ट करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढून त्यांना पून्हा घरी जाण्यास विनवनी केली. माञ हळू हळू हजारोंच्या संख्येने नागरिक जमू लागल्याचे पाहून पोलिसांनी वाढीवफौज मागवली. ही गर्दी लक्षात घेता अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळेच गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

परिस्थिती नियंञणात आल्यानंतर या जमाव जमण्यामागील कारणांचा पोलिस शोध घेऊ लागले. त्यावेळी एका वृत्त वाहिनीने चुकीची बातमी चालवल्यामुळे हा जमाव जमा झाल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी त्या पञकारावर गुन्हा नोंदवत त्याला अटक केला. तर दुसरीकडे उत्तर भारतीयांचा नेता म्हणवून घेणाऱ्या विनय दुबेच्या आवाहाननंतर हा जमाव जमा झाल्याचा निकष काढत पोलिसांनी त्याच्यावर ही गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. तर संचारबंदीच्या कायद्याचे उल्लघंन केल्या प्रकरणी पोलिसांनी तिसरा गुन्हा जमावावर दाखल केला. नोंदवण्यात आलेल्या तीन गुन्ह्यामधील दोन गुन्ह्यात पोलिसांनी आरोपींना अटक करत, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली. राञी उशिरा याच प्रकरणात पोलिसांना अन्य तीन जणांना अटक करत, सहा जणांना ताब्यात घेतले आहे. या तिघांवर पोलिसांनी भादवि कलम 143, 147, 149, 186, 188  तसेच आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा