आर्थिक घोटाळ्यांची संख्या १५ टक्क्यांनी वाढली

मागील काही वर्षातील या सारखी तब्बल ६ हजार ८०१ प्रकरण ही आता पुढे आली आहेत. मागील वर्षांच्या तुलनेतत बँकांमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्यांची संख्या १५ टक्क्यांनी उंचावली असून गेल्या वित्त वर्षांत ही रक्कम ७१ हजार ५४३ कोटी रुपयांवर गेली आहे.

SHARE

देशात आर्थिक झालेले घोटाळे हे दिवसेंदिवस बाहेर येत असून मागील काही महिन्यात या घोटाळ्यांची संख्या १५ टक्यांनी वाढली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात तब्बल ६ हजार ८०१ घोटाळ्यांची प्रकरणे नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणांत  ७१ हजार ५४३ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. यातील सर्वाधिक घोटाळे  हे  सार्वजनिक बँकांमधून झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

देशात निरव मोदी, विजय मल्या यांची नावे पुढे आले की देशातील बँकांमध्ये झालेले आर्थिक घोटाळे सर्वांच्या लक्षात येतात. मात्र मागील काही वर्षातील या सारखी तब्बल ६ हजार ८०१ प्रकरणं आता पुढे आली आहेत. मागील वर्षांच्या तुलनेतत बँकांमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्यांची संख्या १५ टक्क्यांनी वाढली असून मागील आर्थिक वर्षात ही रक्कम ७१ हजार ५४३ कोटी रुपयांवर गेली आहे. २०१७-१८ मध्ये  ५ हजार ९१६ बँक घोटाळ्यांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या.  या तक्रारीतील  घोटाळ्याची रक्कम ही ४१ हजार १६७.०४ कोटी रुपये होती.

देशात सर्वाधिक बँक घोटाळे हे सार्वजनिक बँकांमधून होत असल्याचे पुढे आले आहे. सार्वजनिक बँकांमधील घोटाळ्यांची प्रकरणे ३ हजार ७६६ व त्यातील रक्कम ६४ हजार ५०९.४३ कोटी रुपये नोंदली गेली आहे. १०० कोटी रुपयांवरील रकमेच्या घोटाळ्यांतील रक्कम ५२ हजार २०० कोटी आहे. कार्ड, इंटरनेट तसेच ठेवींबाबत झालेल्या घोटाळ्याचं प्रमाण ०.३ टक्के आहे. हा अहवाल दरवर्षी प्रदर्शित करण्यात येतो.हेही वाचा  -

ओशिवरात नैराश्येतून माॅडेल तरूणीची आत्महत्या

सामूहिक अत्याचार झालेल्या मुलीची मृत्यूशी झुंज संपली

उच्चभ्रू वस्तीत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या